कंपनीतील हाताखाली काम करणार्या तरुणीवर बलात्कार (Rape in Pune) करुन तिला धमकावून तिच्याकडून पैसे उकळणार्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा खटला लव जिहादचा (Love Jihad) असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुलाने (Additional Sessions Judge SS Gulane) यांनी हा निकाल दिला. इस्माईल अब्दुल रहेमान करजगी Ismail Abdul Rahman Karjagi (वय ४२, रा. सोलापूर – Solapur) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.आरोपी इस्माईल करजगी व पिडित महिला एकाच कंपनीमध्ये २०१० मध्ये नोकरीला होते. करजगी हा उच्च पदावर असून पिडित महिला त्याच्या हाताखाली कामाला होती. त्याने या महिलेकडे हात उसने पैसे मागितले होते. महिलेने वेळोवेळी त्याच्या खात्यात पैसे भरले होते. घटनेच्या दिवशी करजगीने या महिलेला सांगितले की, त्याची एक मैत्रिण सिंहगड रोड येथील सदनिकेवर येणार आहे. तू पण चल असे खोटे बोलून तिला तो घेऊन गेला. तेथे कोणीही नव्हते. तिथे आरोपीने पिडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पिडित महिलेचे लग्न झाले. उच्च शिक्षित असलेल्या पिडितेच्या पतीला आरोपीने मेल पाठवून त्यात आरोपी व पिडितेचा त्यांच्या कार्यालयातील नोकरीच्या ठिकाणाचा एका कार्यक्रमाचा फोटो होता. त्यात त्याने ‘‘ये तो अभी शुरुवात है, अभी तो बहुत फोटो और व्हिडिओ बाकी है’’ असे म्हटले व पैशांची मागणी केली होती.
0 Comments