मोहम्मदी उर्दू शाळेत लायन्स क्लब ऑफ तारापूरच्या सदस्यांच्या सत्कार
तारापूर : पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील मोहम्मदी उर्दू शाळा येथे माध्यमिक ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक हमीदुल हसन यांचा अध्यक्षतेखाली लायन्स क्लब ऑफ तारापूर च्या सदस्याचा सत्कार समारोहचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुदस्सर ,डॉ. करवीर ,रत्नाकर मोरे ,डॉ. नयना मुदस्सर ,डॉ. लीना माने , इम्तियाज नेक, जहीर खेरानी, सुलोचना राठोड ,शहजाद मेमण सह अनेक मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमा प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2021 व 22 या सालामध्ये इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक रु.5000/- द्वितीय क्रमांक रु.3000/-
ततृतीय क्रमांक रू.2000/-असे विद्यार्थ्यांना पारितोषिक डॉक्टर मुदस्सर बोईसर यांच्यातर्फे देण्यात आले.
लायन्स क्लब तारापूर यांच्यातर्फे शाळेतील हॉलमध्ये 6 वाॅल फॅन देण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर करवीर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच डॉक्टर मुदस्सर यांनी शिक्षण क्षेत्रातील मुला मुलींना प्रगती व विकास करण्याचा दृष्टीने सल्ला दिला तर प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शकील असार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व कलीम सर यांनी सूत्रसंचालनाचे काम केले. तसेच शाहिद सर यांनी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
0 Comments