Palghar : अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. हल्ली क्षुल्लक कारणावरून वाद होतात, त्यानंतर त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होते, कधी कधी तर वाद इतके टोकाला जातात की त्यामध्ये एकमेकांचा जीव घ्यायला देखील लोक घाबरत नाही. 

अशीच एक क्षुल्लक कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारीची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पालघरमधील दांडी ग्रामपंचायतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

पालघर - केलेल्या कामाचे बिल देण्यावरून ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि उपसरपंच गटाची तुंबळ हाणामारी . पालघर मधील दांडी ग्रामपंचायत मधील धक्कादायक प्रकार . हाणामारीची घटना ग्रामपंचायत कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद . 

 मारहाणीत महिलांनाही चोप . 

ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्च्यांनी एकमेकांना मारहाण . दोन्ही गटातील 21 जणांवर गुन्हा दाखल . 324 सह विविध कलमां अंतर्गत सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .