दि. १९/०९/२०२३ ते दि.२८/०९/२०२३ रोजी पावेतो श्रीगणेशोत्सव सण साजरा होत आहे. पालघर जिल्ह्यात श्री गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात एकूण ९१५० खाजगी गणेश मुर्तीची तसेच २०१६ सार्वजनिक गणेश मुर्तीची स्थापना होणार आहे. त्याअनुषंगाने बोईसर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात खाजगी तसेच सार्वजनीक गणेश मुर्तीची स्थापना होणार आहे. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रात बोईसर हे पश्चिम रेल्वेचे मोठे स्टेशन असुन दररोज सुमारे ४० ते ४५ हजार प्रवाशी रेल्वेने व इतर मार्गाने सुमारे ३५,००० कामगार औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी येत असतात. तसेच बोईसरहुन मोठया प्रमाणात चाकरमानी मुंबई व वापीच्या दिशेने नोकरी व व्यवसाय निमित्त प्रवास करीत आहेत. बोईसर ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात औद्योगिक विकास महामंडळाची येत नाही. परंतु मोठया प्रमाणावार कामगार वर्ग हा बोईसर ग्रामपंचायतीच्या व लगतच्या कार्यक्षेत्रात राहत असुन दैनिक प्रवास बाजार खरेदी विक्री शाळा कॉलेज दवाखाने या कामासाठी वाहनाने ये-जा करीत असतात. दि. १९/०९/२०२३ रोजी ते २८/०९/२०२३ रोजीपासुन गणपती उत्सव चालु होत असुन आगामी गणपती उत्सव दरम्यान रेल्वे स्टेशन या परिसरात वाहतुक कोंडी झाल्यास नागरीकांना त्रास सहन करावा लागेल.
तसेच पालघर नगरपरिषद क्षेत्रात वाहतुकीच्या समस्येच्या अनुषंगाने आगामी गणपती उत्सव दरम्यान दि. १९/०९/२०२३ रोजी ते २८/०९/२०२३ रोजीपावेतो प्रायोगिक तत्वावर एक दिशा मार्ग होणेबाबत एकेरी मार्ग वाहतुक सुरु करणेबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील जा.क्र./गृह/का.१/टे.४/ गणपती गौरी उत्सव/ एकदिशामार्ग/वाहतुक नियंत्रण अधिसुचना / एस. आर. ०६/२३ दि. १५/०९/२०२३ अन्वये एकदिशा मार्ग करणेबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बोईसर शहर वाहतुकीकरीता एकदिशा मार्ग
• तारापुर येथून येणारे वाहन बस डेपो रेल्वे स्टेशन नवापुर नाका मधुर हॉटेल समोरुन सिडको बायपास व ओसवाल मार्गे तारापुर रोड मार्गे जातील.
पालघर वरुन येणारे वाहन नवापुर रोड मार्गे मधुर हॉटेल समोरुन सिडको बायपास व ओसवाल मार्गे जातील.
पालघर नगरपरिषद क्षेत्र एकदिशा मार्ग
• पाचबत्ती चौक (हुतात्मा चौक ) - पालघर रेल्वे स्टेशन मच्छिमार्केट (मनोर रोड) - छत्रपती शिवाजी महाराज चौक चाररस्ता
जगदंबा नाका हुतात्मा चौक (पाचबत्ती)- लोकमान्य हॉटेल -पालघर रेल्वे स्टेशन
चाररस्ता-छत्रपती शिवाजी महाराज चौक कडुन येणारी वाहने पृथ्वी चौक - देविसहाय रोड-पाचबत्ती- पालघर रेल्वे स्टेशन
बोईसर शहरात दररोज इतर राज्यातुन बोईसर औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणात मालवाहु जड- अवजड वाहने ये-जा करीत असतात. सदर वाहनांमुळे कोणतीही वाहतुक समस्या होवु नये याकरीता दि. १९/०९/२०२३ रोजी ते २८/०९/२०२३ रोजीपासुन गणपती उत्सव चालु होत असुन दि. १९/०९/२०२३ रोजी गणपती आगमन दि. २०/०९/२०२३ रोजी दिड दिवस गणेश मुर्ती विसर्जन दि. २३/०९/२०२३ रोजी पाच दिवसांचे गणेश मुर्ती व गौरी विर्सजन दि. २५/०९/२०२३ रोजी सात दिवसांचे गणेश मुर्ती विसर्जन दि. २८/०९/२०२३ रोजी अनंत चर्तुदशी ११ दिवसांचे गणपती मुर्ती विर्सजन असल्याने सर्व जड - अवजड वाहनांना करीता गणपती विसर्जन मार्गात प्रवेश बंद बाबत अधिसूचना निर्गमित होणेस विनंती आहे.
तसेच पालघर नगरपरिषद क्षेत्रात गणशोत्सव कालावधीत पालघर बोईसर रोड चाररस्ता ते पालघर रेल्वे स्टेशन व पालघर रेल्वे स्टेशन ते टेंभोडे मार्गे गणेशकुंड पर्यंत तसेच पालघर माहिम रोड स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते नम स्कुल ते टेंभोडे मार्गे गणेश कुंड पर्यंत श्री. गणेशमुर्ती व गौरीमुर्ती विर्सजन मार्ग असुन त्या दरम्यान नागरीकांची मोठया प्रमाण गर्दी होण्याची शक्यता असते. सदर गर्दीचे वेळी जड अवजड वाहनांमुळे वाहतुकीची समस्या होवुन अपघात होवु शकतो.
तरी आगामी गणपती उत्सव दरम्यान गणपती मुर्ती विसर्जन व गौरी मुर्ती विसर्जन वेळी दि. १९/०९/२०२३ दि. २०/०९/२०२३ दि.२३/०९/२०२३, दि. २५/०९/२०२३ दि. २८/०९/२०२३ रोजीपावेतो मा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील जा.क्र./गृह/का.१/टे. ४/गणपतीगौरीउत्सव // वाहतुक नियंत्रण अधिसुचना / एस.आर.०५/२३ दि. १४/०९/२०२३ अन्वये सर्व जड - अवजड वाहनांकरीता गणपती विसर्जन मार्गात प्रवेश बंद बाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे.
बोईसर शहरांत येणारे जड- अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणारा मार्ग
• तारापुरकडुन बस डेपो - बोईसर रेल्वे स्टेशन- नवापुर नाकाकडे येणारी सर्व जड - अवजड वाहने
पालघर वरुन येणारे वाहन नवापुर रोड मार्गे बोईसर रेल्वे स्टेशन परिसरात येणारे सर्व जड - अवजड वाहने
पालघर शहरात येणारे जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणारा मार्ग
• मनोरकडुन पालघर शहरात येणारी सर्व जड - अवजड वाहने
बोईसरकडुन चारस्ता मार्गे व आंबेडकर चौकातुन पालघर शहरात येणारी सर्व जड - अवजड वाहने
0 Comments